Uncensored मराठी

Antop Hill : १६ कोटींच्या ड्रग्स सह तिघांना अटक..

Published

on

Akash Sonawane, Mumbai Uncensored, 13 January 2022 :

मुंबई पोलिस गुन्हे शाखा युनिट – १ च्या अधिकाऱ्यांनी दिनांक १२/०१/२०२२ रोजी संध्याकाळी, एका गुप्त माहितीच्या आधारे एसएमडी रोड, अँटॉप हिल परिसरातून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सामानांची झडती घेतली असता, पोलिसांना १६.१०० किलोग्राम इतक्या वजनाचे सुमारे १६.१० कोटी रुपयांचे मेथाक्वॉलोन नामक अंमली पदार्थ सापडले.

दरम्यान या तिघांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत,अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version