Uncensored मराठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोरेगावात रक्तदानाचा विक्रम..!

Published

on

Akash Sonawane – Mumbai Uncensored, 26th January 2022

स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा तर सर्वच देत असतात. परंतु सामाजिक उपक्रमांतून उपदेश आणि मदत करणारे कमीच पाहायला मिळतात. समाजसेवेची अशीच भावना बाळगत गोरेगाव येथे भाजप चे उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष विक्रम राजपूत यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने विक्रम नेहमीच सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. 

सध्याच्या या बिकट परिस्थितीमुळे रक्तपेढयांमधील साठा सुद्धा कमी होत चालला आहे. महामारी मुळे रक्तदानाबाबत जनजागृती कमी होऊन हि परिस्थिती निर्माण होत आहे याच गोष्टींचा विचार करुन विक्रम राजपूत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर फक्त रक्तदान शिबिराचे आयोजनच नाही तर एका सामाजिक उपक्रमातून जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला आहे.

रक्तदान तर श्रेष्ठदान आहेच परंतु विक्रम राजपूत यांनी प्रजासत्ताक शुभदिनी तब्बल २६६ रक्त दात्यांना एकत्र करुन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्व. मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांस सोपविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version