Crime News

‘भाजपा’ च्या झेंड्यावर ‘क्रूर गौहत्या’; मुस्लिम तरुणांचा भाजपा मणिपूर विरोधात आक्रोश..!

Published

on

भाजपाच्या झेंड्यावर मुस्लिम तरुणांनी क्रूरतेने गायीची कत्तल करुन मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि भाजपा मणिपूरच्या प्रदेश अध्यक्षा अधिकारीमायुम सारदा देवी यांच्या विरोधात शिविगाळ आणि निदर्शने केली.

Akash Sonawane – Mumbai Uncensored, 2nd January 2022 :

इंफाळ, मणिपुर : भारतीय जनता पक्षाचे तिकीट नाकारलेल्या उमेदवाराच्या मुस्लिम समर्थकांनी भाजपाच्या झेंड्यावर क्रूरतेने गाईचा गळा चिरुन कत्तल केली आणि भाजपाच्या झेंड्यावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेल्या गाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

व्हिडिओमध्ये, मुस्लिम तरुणांच्या एका गटाने हे कृत्य केले असून मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग आणि भाजपाच्या मणिपूर प्रदेश अध्यक्षा सारदा देवी हे मुख्यतः त्यांच्या निशाण्यावर असल्याचे निदर्शनास आले.

सदर व्हिडिओ विविध जाती आणि समुदायातील सदस्यांमधील मतभेद आणि शत्रुत्वाच्या भावनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि हे रोखण्यासाठी तसेच विविध धार्मिक गटांमधील सुसंवाद राखन्यासाठी पश्चिम इंफाळमधील लिलाँग पोलिस अधिकार्‍यांनी या घटनेची पुष्टी केली.

लिलाँग पोलिसांनी एफआयआर क्रमांक १०(०१) २०२२ लिलाँग पीएस, U/S १५३अ /४२९/५०४  भा.दं.वि. कलम ११ (१) प्राणी क्‍लेश प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच अब्दुल रहीम चा मुलगा अब्दुल रशीद (२८), नजबुल हुसेन (३८), आरिफ खान (३१) ह्या तीन आरोपींना अटक केली आहे.

सार्वजनिक वृत्तांनुसार, भाजपाचे तिकीट नाकारलेल्या एका उमेदवाराच्या समर्थनार्थ त्या तरुणांनी भाजपच्या झेंड्यावर गाईची कत्तल केली. जमावाने मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि भाजप मणिपूरच्या प्रदेश अध्यक्षा सारदा देवी यांनाही शिवीगाळ केली तसेच नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात निदर्शने देखील केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version