Uncensored मराठी

“सरकार कमाल म्हणून, सरकारी बाबुंची धमाल..!” – म्हाडा कार्यालयातील कर्मचारी साखर झोपेत?

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 20th April 2022

राज्यभर उत्सवाचा विकएंड असा १४ एप्रिल ते १७ एप्रिल लागोपाठ सण आल्याकारणाने सुट्ट्यांचा आणि जल्लोषाचा विकएंड होता. मात्र ह्या सुट्ट्यांच्या हँगओव्हर मध्ये असलेल्या म्हाडा कर्मचाऱ्यांची मुंबईत पोलखोल झाली आहे.

सोमवार दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ च्या सुमारास भाजपा युवा मोर्चा चे मुंबई सचिव संकेत नलावडे हे कफ परेड, कुलाबा येथील कार्यकारी अभियंता ‘अ’ विभाग म्हाडा या कार्यालयात गेले असता चक्क टाळा लागलेला त्यांना दिसला. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी आजूबाजूस चौकशी केली असता तेथील एक सफाई कर्मचारी दुसऱ्याच कोणत्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला घेऊन आला आणि कुलूप उघडण्यास सांगितले. 

सुमारे १०.२२ ला कार्यालयात प्रवेश करून नलावडे यांनी एक व्हिडिओ द्वारे सर्व अधिकाऱ्यांच्या केबिन बंद असल्याचे सांगितले आणि संपूर्ण कार्यालय ओसाड असल्याचे सुद्धा दाखवले. सदर प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री यांना ट्विट देखील केले. या ट्विटमध्ये त्यांनी “सरकार कमाल म्हणून, सरकारी बाबुंची धमाल..!” अशी टीका सरकार वर केली. सोबतच असे रोज घडत असून येथील कर्मचारी १२-१२ वाजेपर्यंत कामावर येत नाहीत असेही सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version