Uncensored मराठी

मुंबईत लेखिकेवर पंचतारांकित हॉटेल मध्ये बलात्कार, “डी-गँग” ने गप्प राहण्याची दिली धमकी..

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 17th June 2022

मुंबईतील जुहू परिसरात एका ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ७५ वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

“मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने एका ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे,” असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने बलात्कार पीडितेला धमकी दिली आणि तिने पोलिसात तक्रार केल्यास तो तिला ठार मारेल, असेही त्यांनी सांगितले. पीडित महिलेने मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात या व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलेने आरोप केला आहे की, तिला आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवू नये म्हणून धमकी देणारा ‘डी’ गँगचा फोन आला होता. 

आरोपी व्यावसायिकाने पीडित महिलेकडून २ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही. पीडित महिलेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी व्यावसायिक आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांबाबत कोणाला काही सांगितले तर तुला ठार मारले जाईल, अशी धमकी दिली गेली. 

या प्रकरणाचा तपास सध्या आंबोली पोलिसांकडून एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस महिलेच्या आरोपाची चौकशी करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version