Entertainment

महेश नेने प्रस्तुत ‘चिमाजी आप्पा – एक अविस्मरणीय योद्धा’ चित्रपटातील हिंदूंवर होणाऱ्या क्रूर अत्याचार आणि धर्मांतराच्या दृश्यांचे काही अंश..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 28th April 2022

साधारण पोर्तुगीज हिंदुस्थानात आल्यापसून व्यापार कमी पण धर्म परीवर्तनात जास्त लक्ष घालत होते. अनेक मिशनरी या कामात व्यस्त होत्या. गोव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी धर्म परीवर्तनाचा उच्छाद मांडला होता. हिंदूंवर अनेक अत्याचार घडत होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात तर अतिशय बिकट परीस्थीती उद्भवली होती.

दिवसा ढवळ्या अत्याचार, मंदिरांची तोडफोड होत होती. हिंदू धर्मावर अतिशय जाचक असे कर बसवण्यात आले होते. अगदी देव-देवतांची पूजा सुद्धा चोरून कराव्या लागत होत्या आणि पूजा अर्चा करणार्‍यांवर पाशवी अत्याचार केले जात होते.

बाजीराव पेशवे व त्यांचे धाकटे बंधु चिमाजी आप्पा हे निजाम, मुघल यांना कडवी झुंज देत होते. अगदी त्या परीस्थीतीत सुद्धा बाजीरावांनी फिरंग्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिथेही त्यांच्या पदरी अपमानच आला. शेवटी बाजीरावांनी त्यांच्या धाकट्या बंधुना पोर्तुगीजांवर धाडले. आणि त्या नंतर चिमाजी आप्पांनी जो पराक्रम गाजवला त्याचे चित्रण महेश नेने प्रॉडक्शन्स लवकरच “चिमाजी आप्पा- एक अविस्मरणीय योद्धा” या चित्रपटाद्वारे तुमच्या समोर आणणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version