रत्नागिरी, महाराष्ट्र – 10 ऑगस्ट, 2024: लव्ह जिहादच्या प्रकरणात फसलेल्या एका तरुणीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, ज्यात तिने इंस्टाग्रामवर भेटलेल्या एका मुस्लिम मुलाने हिंदू नाव सांगून आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे इंस्टाग्राम लव्ह जिहादच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता वाढली आहे.
दाखल झालेल्या FIR नुसार पीडित मुलीने म्हटले कि “जुलै 2023 मध्ये माझ्या इन्स्टाग्राम ID वर @pvt.0122_ या USER ID वरुन फ्रेंड रिक्वेस्ट आलेली होती. ती फ्रेंड रिक्वेस्ट मी स्विकारली होती. त्यानंतर समोरुन हर्षकुमार यादव नावाचा मुलगा माझ्यासोबत दररोज चॅटिंग करत होता. त्याने मला तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगून तो बीएमएसच्या दुस-या वर्षाला शिकत असल्याचे सांगितले. तो कॉलेजचा विद्यार्थी असल्याने मी त्याच्यासोबत चॅटिंग करीत होते. काही महिन्यांनंतर त्याने मला माझे फोटो पाठविण्यासाठी सांगितले. म्हणून मी त्याला माझे काही फोटो पाठवले. त्यानेदेखील त्याचे काही फोटो मला पाठविलेले होते. त्यामुळे आमच्यामध्ये बोलणे वाढत गेले. आम्ही एकमेकांना आपले व्हाट्सअँप नंबर पाठवले, तो मला व्हाट्सअँप कॉल करीत असे. हर्षकुमार यादव याने मला तो रत्नगिरी राज्य महाराष्ट्र येथे रहात असल्याचे सांगितले.
तसेच त्याचे आई वडील राजकारणामध्ये असून त्याच्या वडिलांची डिझेल फॅक्टरी आहे असे सांगितले. हर्ष सकाळी कॉलेजला जातो व कॉलेजवरुन आल्यावर वडिलांची डिझेल फॅक्टरी सांभाळतो असे त्याने मला सांगितल्याने मी त्याच्यावर प्रभावित झालेले होते.”
हर्ष नेहमी पीडित मुलीला त्याच्या आई वडिलांविषयी सांगायचा. त्याचे आईवडील त्याला नेहमी वाईट बोलतात, ओरडतात, रागवतात त्याच्यावर कोणी प्रेम करीत नाही असे सांगून तो तिच्याशी चॅटिंग करत आहे, आणि तेव्हापासून तो सुधारलेला असून त्याचे त्याच्या घरातील लोकांसोबत नातेसंबंध सुधारलेले आहेत असे बोलू लागला.
हर्षने पीडितेशी लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली. 2 ऑगस्ट 2024 रोजी हर्षने पीडितेला सांगितले की तो नुकताच 22 वर्षांचा झाला आहे आणि त्याचे आईवडील त्यांचे लग्न लावण्यास तयार आहेत. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडितेने 5 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीला जाण्यासाठी तिचे घर सोडले, जिथे लग्न होणार होते. हर्षने कथितरित्या तिला पेटीएम द्वारे प्रवास खर्च पाठवला होता, ज्यात रिक्षाचे भाडे, चंदीगड ते रत्नागिरी ट्रेनचे तिकीट आणि बरेच काही होते.
8 ऑगस्ट 2024 रोजी रत्नागिरीला पोहोचल्यानंतर पीडितेने हर्षने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एका मुलीने कॉल उचलला आणि सांगितले हा हर्षचा नंबर नाही, हा रुझान चा नंबर आहे. पीडितेने हर्षबाबत चौकशी केली असता, हर्ष नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ती ओळखत नाही, असे फोन वर पीडित मुलीला सांगण्यात आले.
आपली लव्ह जिहादच्या प्रकरणात फसवणूक झाल्याचा संशय आल्याने पीडितेने रत्नागिरी रेल्वे स्टेशन रोडवरील एका स्थानिक मोबाईल शॉपमध्ये मदत मागितली. तिची कहाणी ऐकून दुकान मालकाने तिच्या वडिलांशी आणि पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडितेला तिच्या सुरक्षिततेसाठी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले. 10 ऑगस्ट 2024 रोजी तिचे वडील, कौटुंबिक मित्र चंद्रकांत राऊळ आणि सागर कदम यांच्यासह हर्ष कुमार यादव विरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी तिला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि गुंतलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण ऑनलाइन परस्परसंवादाचे धोके आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नातेसंबंध निर्माण करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करते.