Mumbai Internal Security

ख्रिस्ती मिशनरींचे, टार्गेट मुंबई…

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 24th May 2022

मुंबईत मागील काही दिवसांमध्ये ख्रिस्ती धर्मियांचे प्रचारक आणि त्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चर्चेत आसल्याचे सोशल मीडियाद्वारे दिसून येत आहे. ह्या कार्यक्रमांचे आयोजन काही चर्च मार्फत, ख्रिस्ती संस्थांमार्फत किंवा त्यांच्या धर्मगुरुंमार्फत करण्यात येते. लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हे मिशनरी परमेश्वर किंवा प्रभू येशूच्या नावाखाली बोगसरित्या लोकांना काही चित्र विचित्र प्रक्रिया आणि मंत्रोउच्चारण करून बरे करण्याचा दावा करत असतात. 

अशाच एका पादरी बजींदर सिंग मिनिस्ट्री नामक व्यक्तीचा वांद्रे कुर्ला संकुल येथील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. हा पादरी बोगस असून त्याच्यावर बलात्कार, बाल हक्क अयोग्य, अंधश्रद्धा कायद्यान्वये आणि असे अनेक खटले सुरु असल्या कारणाने हिंदू व शीख समाजाने व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या संघटनांनी विरोध दर्शवून कार्यक्रम रद्द केला गेला होता. 

परंतु असे अनेक पादरी व त्यांच्या मिशनरी कार्यरत असून असा आणखी एक कार्यक्रम समोर आला आहे. दिनांक २७ मे २०२२ रोजी मेयर ऑडिटोरिअम, बर्फीवाला रोड, अंधेरी पश्चिम येथे होणाऱ्या पादरी वेंकट, एच इ फाऊंडेशन, संस्थापक जरेमीआ तेकी, संतोष कोली मिनिस्ट्री, अँथोनी राज, जॉन आनंद आयोजित “अराईज अँड शाईन” नामक कार्यक्रमासाठी समाजातुन विरोध दर्शवला जात आहे. जनतेची दिशाभूल करणे, अंधश्रद्धेचा प्रचार तसेच समर्थन करणे, लोकांची फसवणूक करुन ठराविक धर्मामध्ये धर्मांतर करणे या आरोपांवर पादरी वेंकट व त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी देखील काही संस्थांमार्फत मागणी होत असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार आढळून आले आहे. 

ह्या मिशनरी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्टद्वारे आपली जाहिरात करुन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा प्रचार करत असल्याचे स्पष्ट होते. दिनांक १० मे २०२२ पासून ‘एच इ फाऊंडेशन’ या फेसबुक पेज वरुन ह्या कार्यक्रमाच्या जाहिराती होत असून विविध पोस्ट द्वारे या कार्यक्रमास, देवाने पाठवलेल्या पादरी वेंकट याला ऐकायला येण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच आपल्या कार्यक्रमांमध्ये विचित्र आवाज, गाणी, घोषणा आणि अमानवीय क्रिया करुन लोकांच्या मानसिक संतुलनावर घाला घालत असल्याचे प्रसारित केलेल्या काही व्हिडिओंमधून आढळून येते. 

‘सॅफ्रन थिंक टॅंक’ संघटनेचे संस्थापक सिद्धांत मोहिते यांनी सदर विषयांवर आवाज उठवून लेखी तक्रारी दिल्या आहेत. या समाज कंटकांच्या विरोधी अनेक तक्रारी व विरोध असल्याचे प्रचलित असून सुद्धा सामान्य जनता याला बळी पडते. परंतू यांच्या विरोधात कारवाई केली जात नाही, त्याउलट अशा कार्यक्रमाना अधिकृत परवानग्याही दिल्या जातात. विरोध झाल्याशिवाय जर असे कार्यक्रम होणे बंद झाले नाही तर अंधश्रद्धेमार्फत धर्मांतराला वाव मिळतच राहील. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version