Uncensored मराठी

नवीन प्रभाग रचनांवरुन भाजप अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर, प्रवीण छेडा आणि बिंदू त्रिवेदी यांचा महिला नगरसेविकेवर हल्ला..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 6th June 2022


दिनांक २ जून २०२२ रोजी घाटकोपर पश्चिम पाटीदार सभागृह येथे नवीन प्रभाग रचनेसंबंधी पार पडलेल्या बैठकीनंतर माजी नगरसेविका रितू तावडे व भाजप नेते भालचंद्र शिरसाट हे बोलत असताना अचानक बिंदू त्रिवेदी यांनी बेसावध असणाऱ्या रितू तावडे यांच्यावर हल्ला केला व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर घटनेत घाटकोपरचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा हे सामील होऊन रितू तावडे यांचे मनगट दाबून स्वतःच्या चारचाकी गाडीवर जकडून धरले केला. ज्यात माजी नगरसेविका रितू तावडे या गंभीर रित्या जखमी होऊन त्यांना शारीरिक तसेच मानसिक इजा झाल्या.

महानगरपालिका निवडणुकांपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यानंतर इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे तिकिटांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यानुसार २ जून रोजी भाजपने प्रभाग रचनेवर चर्चा करण्यासाठी अंतर्गत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका बिंदू त्रिवेदी आणि प्रवीण छेडा यांनी माजी नगरसेविका रितू तावडे यांच्यावर हल्ला केला.

राजावाडी रुग्णालय येथे प्राथमिक उपचारांनंतर माजी नगरसेविका रितू तावडे यांनी माध्यमांद्वारे हा प्रकार उघड केला ज्यात त्यांनी पक्षाला सदर घटनेवर विचार करण्यास सांगितले आहे व प्रविण छेडा विरोधात निषेध दर्शवला असून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचेही सांगितले आहे. तसेच रितू तावडे यांची मुलगी मधुरा तावडे यांनी सुद्धा सदर घटनेसाठी न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. “माझी आई श्रीमती रितू तावडे या घटनेनंतर मानसिक आघाताने त्रस्त आहे आणि मला माझ्या आईच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे. प्रवीण छेडा यांची अशी गुंडागिरी खपवून घेतली जाणार नाही. आयुष्यभर लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या श्रीमती रितू तावडे यांना न्याय मिळावा. तिचे मनगट दाबले गेले होते आणि अजूनही तिच्या हातावर जखमा ताज्या आहेत,” असे मधुरा तावडे यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version