Uncensored मराठी

दिंडोशी मेट्रो स्थानकाचे नाव पठाणवाडी करावे याप्रकरणी एमएमआरडीएला हायकोर्टाचे आदेश, दोन आठवड्यात प्रतिज्ञा सादर करण्याची मागणी

Published

on

पश्चिम उपनगरातील मेट्रो-७ वरील स्थानकाच्या नामांतरावरून वाद निर्माण झाला आहे. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावरील मेट्रो स्थानकाचे नाव दिंडोशी ऐवजी पठाणवाडी करावे अशी मागणी करत ’नई रोशनी’ या  सेवाभावी संस्था करत आहे. ऍडव्होकेट अल्ताफ खान यांच्यामार्फत हायकोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र, याचिकेवर सुनावणी हवी असल्यास १६ जूनपर्यंत एक लाख रुपये जमा करा, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने संस्थेला दिले आहेत. खंडपीठाने याप्रकरणी दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे एमएमआरडीएला आदेश देण्यात आले आहेत. 

२०१० मध्ये केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, २०२० दरम्यान राजकीय दबावापोटी एमएमआरडीएच्या आयुक्तांनी स्थानकाचे नाव दिंडोशी केले. एमएमआरडीएच्या नियमानुसार, एखाद्या ठिकाणी दोन मेट्रो स्थानकं येणार असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा अतिपरिचित नावं देण्यात येते. त्यासाठी तेथील वाडी, पाडे यांचा विचार केला जातो. मेट्रो २ मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो ७ च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

दुसरीकडे, मेट्रो स्थानक जवळ एक उड्डाणपूल असून तो पठाणवाडी या नावाने ओखळला जातो. तेथील बेस्टच्या थांब्यालाही पठाणवाडी हेच नाव आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाला सुद्धा पठाणवाडी असे नाव द्यावे अशी याचिकेतून विनंती करण्यात आली आहे. दिंडोशी हा परिसर या मेट्रो स्थानकापासून साधारणतः दीड किलोमीटर लांब असल्यामुळे या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. तसेच, स्थानकाच्या नावामुळे त्यांची गफलत देखील होऊ शकते, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

सदर याचिकेवर गुरुवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकाकर्त्यांनी एक लाख रुपये अनामत रक्कम भरल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच, न्यायमूर्तीनी याची दखल घेत एमएमआरडीएच्या ऍड. अक्षय शिंदे यांना प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version