Connect with us

Uncensored मराठी

मुंबईतील सर्वोत्कृष्ट मराठी महिला उद्योजिका

Published

on

Gold Black Modern International Womens Day Greeting Instagram Story

विनया सावंत, २२ मार्च २०२३:

आजच्या युगात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर कार्यरत आहेत. यात महिला उद्योजिकांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सन्मान करूया स्त्री शक्तीचा. घर सांभाळण्यापासून ते एखादा बडा उद्योग जिद्दीने पेलणा-या महिलांविषयी पुरूषांनाही फार कौतुक आहे. आजच्या लेखात जाणून घेऊया मुंबईतील दोन सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकांविषयी. एक सामान्य स्त्री ते एक महिला उद्योजिका होईपर्यंतचा तीचा प्रवास तुमच्यातील स्त्री उद्योजिकेला नक्कीच स्फूर्ती देऊन जाईल.

  • सोनल लोहारीकर
2

सोनल लोहारीकर यांची एस डी एफ ही प्रोडक्शन कंपनी असून ‘SDF CURCUMA’ हा त्यांचा स्वत:चा ब्रॅंड आहे. ही कंपनी जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये हळदीसोबत इतर भारतीय वस्तूंची देखील निर्यात करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनल लोहारीकर या भारताच्या पहिल्या उद्योजिका आहेत, ज्यांनी नागपूरची संत्री, जांभूळ, मोरींगा पावडर, देवगड हापूस, हळद आदी वस्तू परदेशात निर्यात केल्या. नुकतच सोनल यांनी लिहीलेल्या ‘माजघर’ या पुस्तकाला ‘आंतरराष्ट्रीय गोल्डन बूक पुरस्कार’ मिळाला. शिवाय त्यांना ‘आयकॉनीक वुमन ऑफ द इयर २०२२’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यशस्वी वाटचालीबद्दल विचारले असता त्या सांगतात, “मी १६ वर्ष दुबईला होते तेव्हा तिथे आम्हाला काही भारतीय खाद्यपदार्थांची उणीव भासायची. जसं की संत्र, जांभूळ त्यामुळे मग मी भारतीय वस्तू परदेशात निर्यात करण्याचे ठरवले. मग मी भारतात येऊन शेतक-यांसोबत जोडले गेले. महाराष्ट्रातील काही भागात सर्वे केले. आणि या व्यवसायाला सुरूवात झाली. नागपूरची संत्री निर्यात करणारी आमची पहिली कंपनी आहे. आम्ही जवळपास अडीच हजार शेतक-यांसोबत काम करतो. शेतक-यांकडूनच फळं किंवा वस्तू घेतो आणि तश्याच त्या गोष्टी निर्यात करतो. सध्या ‘SDF CURCUMA’ हा हळदीचा ब्रॅंड मार्केटमध्ये टॉपला आहे.”

पुढे त्या सांगतात, “या क्षेत्रात महिला उद्योजिका फार कमी आहेत. सुरूवातीला या एक्सपोर्ट क्षेत्रात पुरूषच जास्त होते. त्यामुळे माझ्या स्ट्रगलींगच्या काळात मला अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. मी व्यवसायातील सर्वच गोष्टींचा बारीक विचार करते. तसेच आम्ही बचत गटांना पॅकेजींगचं प्रशिक्षण देतो. पहिल्यांदा आपल्या मित्रपरिवारात या वस्तू वाटल्या व नंतर दुबईमधील विविध सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी देऊ लागलो. दुबईमधील सुप्रसिद्ध उद्योजक ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांच्या ’अल अदिल’ सुपरमार्केटमध्ये आमची विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली. हे आमचे सर्वात मोठे यश होते. खाद्यपदार्ध बनविण्याचा वारसा मला माझ्या आईकडून लाभला. व्यवसाय करताना आपलं आणि आपल्या भारत देशाचं नावं मोठं व्हावं ही भावना जर मनात ठेवून जर आजच्या महिलांनी सातत्य आणि मेहनत करून व्यवसाय केला. तर त्या नक्कीच यशस्वी होतील.”

  • शितल तेजस साळुंके
1

शितल साळुंके या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत. मुंबईतील मालाड परिसरात त्यांचा टीनाझ मेकअप स्टुडिओ आणि स्वत:ची एमएसएमई मान्यताप्राप्त अकॅडमी देखील आहे. या माध्यमातून त्या व्यवसायाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे देखील काम करतात. या क्षेत्रात त्या मागील ६ वर्षांपासून काम करत आहेत. यादरम्यान त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यात त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘बेस्ट स्टार्टअप अकॅडमी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच CAIT तर्फे नुकताच ‘आयकॉनिक वूमन अवॉर्ड २०२३’ सुद्धा त्यांना मिळाला आहे.

मालाड येथील क्लासेस मध्ये त्या बेसिक ते ऍडव्हान्स असे विविध प्रमाणपत्र व डिप्लोमा कोर्सेस चालवतात. ज्यात सेल्फ मेकअप, ब्राईडल मेकअप, हेअर स्टाईल, नवरी ला साडी कशी नेसायची हे सर्व शिकवतात. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या एमएसएमई मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देखील देतात.

यशस्वी वाटचालीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “मी एकदा एका मैत्रिणीच्या घरामध्ये कार्यक्रमानिमित्त माझ्याकडे असलेल्या मेकअप किट च्या माध्यमातून तिचा मेकअप केला. त्यावर लोकांनी प्रचंड प्रमाणावर प्रेम दाखवत मला स्वतःहून ऑर्डर द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मी कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते. मला असणारी आवड आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहता पूर्णवेळ या क्षेत्रात येण्याचा मी निर्णय घेतला. बेसिक पासून मास्टर पर्यंत मेकअपचे प्रशिक्षण घेतले. ब्राईडल मेकअप मध्ये माझे स्पेशलायझेशन आहे. अजूनही मी सतत सराव करत असते व बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला अपडेट ठेवते.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “व्यवसाय करताना त्याची जाहिरात ही फार महत्वाची असते. सोशल मीडिया 30 टक्के प्रभावी असते मात्र 70 टक्के स्वतः मेहनत घ्यावी लागते. मी पत्रक छापून वाटली, छोट्या मोठ्या मार्केट मध्ये काम केलं, लोकांना लाईव्ह सेशन करून दाखवले तसेच काही महिला उद्योजिकांचे ग्रुप आहेत त्याद्वारे मी माझ्या ग्राहकांपर्यंत पोहोचले. स्वतःची क्षमता ओळखली तर महिला कुठल्याही क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात असे मला वाटते.”

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uncensored मराठी

मीरा रोड येथे ४ वर्षांच्या हिंदू अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ४५ वर्षीय ‘मोहम्मद दाराज’ ला अटक

Published

on

By

12345

सिद्धांत मोहिते, नवघर, मीरा भायंदर:

या घटनेने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. इंटरनेटवर अनेक व्हिज्युअल समोर आले आहेत ज्यात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांचा जमाव नवघर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

मीरा रोड येथे एका मोहम्मद दाराज नावाच्या ४५ वर्षीय व्यक्तीला एका ४ वर्षांच्या हिंदू मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात हा घृणास्पद गुन्हा घडला. आरोपी मोहम्मद दराज याला जमावाने पकडून भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.

दररोज एका नवीन प्रकारच्या जिहादला सामोरे जाणाऱ्या मीरा भायंदर मधील हिंदू नागरिकांनी या भयानक घटनेनंतर प्रचंड निषेध व्यक्त केला आहे.

इंटरनेटवर अनेक व्हिज्युअल समोर आले आहेत ज्यात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या नवघर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शकांचा जमाव दिसत आहे. “त्याला 24 तासांत फाशी द्या,” असे संतप्त हिंदू नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर सांगितले. काही व्हिज्युअल्समध्ये मांसाच्या दुकानाची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली असून, दुकानाच्या परिसरात जमाव उभा आहे.

मीरा रोडवरील ऑरेंज हॉस्पिटलजवळ मोहम्मद दाराज हा ‘महाराष्ट्र चिकन शॉप’ नावाचे मांसाचे दुकान चालवतो. घटनेची माहिती मिळताच लोकांच्या जमावाने आरोपीच्या दुकानात जाऊन तोडफोड करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर जमावाने नवघर पोलीस ठाणे गाठून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला नाही. मात्र, स्थानिकांच्या प्रचंड विरोधानंतर पोलिसांनी अखेर मोहम्मद दराजविरुद्ध एफआयआर दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

अनेक हिंदू संघटना या भयानक घटनेनंतर आक्रमक होताना दिसून येत आहे. या वेळी एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याने असे म्हटले कि “मीरा-भायंदर मधले हिंदू नागरिक या आधी भीतीच्या वातावरणात राहत होते. परंतु राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आमच्यावर ज्या जिहाद्यांनी हल्ला केला, त्यांना आम्ही प्रतिउत्तर दिलंच, आणि आता या पूढे हिंदू समाज या जिहाद्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गेले ते दिवस जेव्हा आम्ही शांत बसून सहन करत होतो, आता आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला सरकार व प्रशासनाने ने न्याय दिला नाही, तर आम्ही आमचा न्याय स्वतः मिळवू, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं”

Continue Reading

Uncensored मराठी

मीरा भाईंदरमध्ये धार्मिक तणाव: अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी

Published

on

By

WhatsApp Image 2024 04 02 at 5.45.08 AM

एक हिंदू अल्पवयीन मुलगा त्याच्या घरी मोबाईल फोनवर गेम खेळत होता, तेव्हा त्याचा मित्र, जो मुस्लिम आणि वयाने अल्पवयीन आहे, घरी आला आणि मोबाईलवर गेम खेळण्यात हिंदू मुलासोबत सामील झाला. या खेळावरून त्यांच्यात किरकोळ भांडण झाले आणि मुस्लिम मुलगा हिंदू मुलाला म्हणाला, “मी तुला एवढा मारेन की तुझा देवही तुला वाचवायला येणार नाही. तेरे राम की ** की ***, और तेरी भी माँ की ***’. , आणि नंतर ठिकाणाहून निघून गेले.

एक दिवसानंतर, 31 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजता अल्पवयीन मुस्लिम मुलगा त्याच्या आणखी एका हिंदू मित्राला भेटला. जेव्हा त्याच्या या मित्राने त्याला विचारले की काल तू आपल्या मित्राला त्याच्या घरी खेळत असताना शिवीगाळ का केलीस? हे ऐकून मुस्लिम अल्पवयीन मुलगा त्याच्यावर ओरडला आणि म्हणाला, ‘तु त्याची बाजू का घेतोस काय?’ आणि त्याने या मित्रालाही लाथा-बुक्क्यांनी बेदम मारून निघून गेला.

मग हा मुस्लीम अल्पवयीन मुलगा आणखी 5 मुस्लिम अल्पवयीन मुलांसह पहिल्या हिंदू मुलाच्या घराबाहेर गेला आणि विचारले, ‘तो कुठे आहे? त्याला बाहेर पाठवा’

या मुस्लीम अल्पवयीन मुलांनी हिंदू अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या भावाला शाळेत येत-जात असताना पकडून बेदम मारहाण केली. हिंदू अल्पवयीन मुलाने आपल्या पालकांना संपूर्ण घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी मीरा-भाईंदरमधील काशीगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

हे सर्व अल्पवयीन असल्याने आरोपी आणि पीडितांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.

Continue Reading

Uncensored मराठी

मीरारोड मध्ये ‘जय श्री राम’ म्हणाल्यामुळे अल्पवयीन मुलाला मारहाण, ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडले; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Published

on

By

Untitled design 2024 03 26T145145.814

मुंबईतील मीरा रोड परिसरात एका 11 वर्षीय मुलाला “जय श्री राम” म्हणाला म्हणून बेदम मारहाण केल्याप्रकरणी पाच अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला फक्त मारहाणच केली नाही तर त्याला “अल्लाह हू अकबर”चा नारा देण्यास जबरदस्ती करण्यात आली.

सोमवार, २५ मार्च रोजी रात्री तो अल्पवयीन मुलगा दूध घेऊन त्याच्या सोसायटीमध्ये आला. सोसायटीजवळ येताच तिकडे उभ्या असलेल्या एका माणसाला तो ‘जय श्री राम’ बोलला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या बाजूला असलेल्या अन्य पाच जणांनी त्याला थांबायला सांगितलं. पण, त्यांना घाबरून हा मुलगा सोसायटीच्या आत पळाला. त्यावेळी हे तरुणसुद्धा त्याचा पाठलाग करत सोसायटीमध्ये शिरले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलाला लिफ्ट जवळ गाठलं आणि बेदम मारहाण केली.

माराहण केल्यानंतर तरुणांनी त्या मुलाला ‘अल्लाहू अकबर’ चा नारा जबरदस्ती द्यायला लावला. एका रहिवाशाने अल्पवयीन मुलावर हल्ला झाल्याचे पाहिल्यानंतर त्याने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून गेले. त्यांनी ताबडतोब अल्पवयीन मुलाच्या वडिलांना माहिती दिली आणि त्यांनी त्याला मीरा रोड पोलिस ठाण्यात नेले. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 448, 295A, 153A, 37, 1C आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, मात्र अद्याप एकाही तरुणाला अटक करण्यात आलेली नाही.

Continue Reading

Trending