सिद्धांत मोहिते, २८ जून, २०२३:
10 जून 2023 रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, मुंबईतील एका सोसायटीतील रहिवाशांनी ‘अर्बन कंपनी’ या लोकप्रिय ऑनलाइन पोर्टलद्वारे सुतारकामासाठी पाठवण्यात आलेल्या कारपेंटरच्या वागणुकीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दोन मुलांच्या पालकांनी नोंदवलेल्या या घटनेमुळे सोसायटी रहिवास्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, ते आता वनराई येथील पोलीस अधिकाऱ्यांकडून त्वरीत कारवाईची मागणी करत आहेत.
पालकांनी पोलिस उपायुक्त, झोन 12 यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, इरफान अहमद नावाच्या सुताराला सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये सुतारकाम करण्यासाठी ‘अर्बन कंपनी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे पाठवण्यात आले होते. इरफान अहमद सकाळी 9:40 वाजता इमारतीत आला आणि सुमारे 10:45 वाजता त्याने त्याचे काम संपवले. काम संपवून तो फ्लॅटमधून बाहेर पडला आणि इमारतीच्या लिफ्टमध्ये शिरला.
लिफ्टच्या आत, आधीच दोन लहान मुले होती, ज्यांनी इरफानला नमस्कार केला, आणि म्हणाले “काका तुम्ही कोण आहेत? आम्ही तुम्हाला ओळखत नाही!” इरफानने लगेच उत्तर दिले, “तुम्ही मला थोड्या वेळाने ओळखू लागाल. मी मुस्लिम आहे आणि मी तुमचा ब्रेनवॉश करणार आहे, तुम्ही हिंदू धर्मा सोडून इस्लाम स्वीकाराल का? माझ्यासोबत चल.” हे ऐकताच मुले घाबरली आणि पटकन तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडली.
थोड्यावेळाने त्यांच्यातील एक लहान मुलगा ट्युशन ला जाण्यासाठी तळ मजल्यावर आला. तेव्हा त्याने सोसायटीच्या बाहेर इरफानला उभं असलेलं पाहिलं. इरफान जोरात म्हणाला, “मेरे बच्चे, मेरे पास आजा”.हे ऐकून तो मुलगा खूप घाबरला आणि तो त्याच्या ट्युशन कडे, म्हणजेच शेजारच्या इमारतीकडे पळाला. घरी परतल्यानंतर मुलाने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यांना धक्काच बसला. न्याय मिळवण्यासाठी आणि त्यांच्या मुलांची तसेच सोसायटीत राहणाऱ्या इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, पालकांनी सोसायटीत राहणाऱ्या इतर सर्व नागरिकांना एकत्र केले, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आणि इरफानचा मोबाईल नंबर सुद्धा घेतला.
या घटनेची तक्रार देण्यासाठी दोन्ही मुलांसह पालकांनी वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी ड्युटीवरील अधिकारी श्री. शिंदे यांना माहिती दिली. शिंदे यांनी इरफानशी संपर्क साधण्याचा बहाणा केला. इरफान काही पोलीस ठाण्यात आलाच नाही! इरफानचा मोबाईल नंबर आणि सीसीटीव्हीचे पुरावे शेअर करूनही, पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नसल्याचे दिसून येते.
पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने निराश झालेल्या पालकांनी श्री. राजभर नावाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांची समस्या सांगितली. श्री.राजभर यांनी पालकांना योग्य ती कार्यवाही करून लवकरच तुम्हाला संपर्क करू असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे पालकांना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व भीती वाटू लागली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये इरफानकडे एक संशयास्पद वस्तू असल्याचे दिसत आहे. मुले पळून गेल्यानंतर त्याने हि संशयास्पद वस्तू पटकन खिशात लपवली. पालकांचा असा अंदाज आहे की ही वस्तू ड्रग्ज किंवा झोपेच्या गोळ्या असू शकते, ज्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे.
पालकांच्या लेखी तक्रारीची प्रत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस अतिरिक्त आयुक्त, मानवाधिकार आयोग आणि मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकासह विविध प्राधिकरणांना पाठवण्यात आली असून, त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. आणि सोसायटीच्या रहिवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाई झाली पाहिजे.
पालकांना आशा आहे की मुंबई पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील आणि त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलतील. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून घरोघरी देण्यात येणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची कठोर पद्धतीने पार्श्वभूमी तपासून घेणे आता गरजेचे ठरणार आहे.