Uncensored मराठी

२.६० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर अमित दोषी अटकेत, जुने धागेदोरे जुळले असता आई वडील फरार..

Published

on

मुंबईत घर घेऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना तसेच मुंबईतील विकासकांचे घोटाळे आपल्या परिचयाचे आहेतच; अशाच एका गुन्ह्याचा तपास माटुंगा पोलीस करत आहेत. 

Akash Sonawane (Sub-Editor) Mumbai Uncensored :

माटुंगा पोलिस ठाणे : खार पश्चिम येथे राहणारा अमित नरेंद्र दोषी (वय ४७) हा आदिनाथ डेव्हलपर्स या नावाने बांधकाम व्यवसाय करीत असून त्या मार्फत मुंबई मध्ये माटुंगा, दादर, वरळी इ. ठिकाणी इमारतींचे पुनर्वसन करत असल्याचे वैभव विजय सावंत यांना सांगून संबंधित इमारतीमध्ये स्वस्त दरात फ्लॅट मिळवून देण्याचे तसेच १९ व्या मजल्याची परवानगी नसताना सुद्धा तेथे सदनिका देण्याचे आमिष दाखवून खोटे दस्तऐवज बनवून सावंत यांची दिशाभूल करून २.६० कोटींची फसवणूक केली. 

सदर आरोपीस माटुंगा पोलिस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांनी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४०६, ३४ सह भा.द.वि. कलम ३, ४, ५, ८, १३ MOFA अन्वये गुन्हे नोंदवून दि. २७/१२/२०२१ रोजी अटक केली असता न्यायालयाकडून दि. ३१/१२/२०२१ रोजी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

दरम्यान पुढील तपास सुरु असताना अमित दोषी याच्यावर २०१६ मध्ये, डॉ विजय पटणी (वय ७२) यांच्यासोबतही अशाच प्रकारचे आमिष दाखवून ८१ लाख रुपये लुबाडल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. डॉ पटणी हे अमित दोषी चे फॅमिली डॉक्टर असून त्याच्या आई वडिलांचे उपचार त्यांच्याकडे सुरु होते. दरम्यान डॉ पटणी यांना दादर येथील रामगुफा को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये पुनर्विकास करत असल्याचे सांगून त्यांच्याकडूनही तब्बल ८१ लाख रुपये लुबाडले होते; परंतु पुढील बाबींसाठी विलंब झाल्यामुळे डॉ पटणी याना संशय आला आणि त्यांनी माटुंगा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.

Matunga Police Station

सदर आरोपाखाली अमित नरेंद्र दोषी याला पोलीस उप-निरीक्षक अमोल सावंत यांनी भा.दं.वि. कलम ४२०, ४०६ तसेच कलम ३, ४, ५, ८, १३ मोफा अन्वये दि. ०६/०१/२०२२ रोजी पुन्हा अटक केली असून न्यायालयाकडून १०/०१/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच त्याची आई चारुल नरेंद्र दोषी आणि वडील नरेंद्र दोषी हे देखिल सदर गुन्ह्यात सामील आणि फरार असून त्यांचा शोध सुरु आहे . 

मुंबईसारख्या शहरांमध्ये सद्यस्थिती अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडत असतात दरम्यान प्रयत्नशील पोलीस प्रशासन न्याय देण्यास तत्पर असल्यामुळे सर्वसामान्य जनता अशा समाज कंटकांपासून सुरक्षित आहे.

Author – Twitter.com/Sonawane_Journo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version