Legal News

Uniform Civil Code : Saffron Think Tank च्या ऑनलाइन याचिकेला १.६० लाख हून अधिक स्वाक्षऱ्या..

Published

on

वादग्रस्त समान नागरी हक्कांची चर्चा पुन्हा उफाळून येऊ लागली असतानाच, सॅफ्रन थिंक टँक नामक हिंदुत्ववादी  संघटनेला लोकांचा अविश्वसनीय पाठिंबा मिळत असून आता या याचिकेवर १ कोटी स्वाक्षऱ्यांचे आवाहन केले जात आहे.

Akash Sonawane – Mumbai Uncensored, 17th February 2022 :

भारतात समान नागरी हक्क (#UniformCivilCode) हि वादग्रस्त मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली असून, समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ट्विटर वर सर्वाधिक ट्विट द्द्वारे ही मागणी पुन्हा चर्चेत आल्याचे निदर्शनास येते दरम्यान एक हिंदुत्ववादी संघटना याचे नेतृत्व करताना दिसत आहे. या संघटनेने ऑनलाईन याचिका (Online Petition) द्वारे नागरिकांचा अविश्वसनीय प्रतिसाद मिळवला आहे.

हिंदुत्व चळवळ पुढे नेण्यासाठी हिंदुत्ववादी जनतेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणारी एक संघटना म्हणून स्वतःची ओळख असलेल्या ‘ सॅफ्रन थिंक टँक ’ ने देशात समान नागरी हक्कांच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे.

केंद्राला समान नागरी हक्क लवकरात लवकर लागू करण्याचे आवाहन करणाऱ्या सॅफ्रन थिंक टॅंक च्या स्वाक्षरी मोहिमेला चेन्ज (Change.org) वर १.६० लाख हुन अधिक लोकांनी पाठिंबा दिला आहे. आणि तब्बल १ कोटी लोकांना यात जोडण्याचे सॅफ्रन थिंक टॅंक चे लक्ष्य आहे.

भारताच्या सर्व नागरिकांसाठी समान नागरी हक्कांच्या दिशेने सहमतीने वाटचाल करणे हे संविधान निर्मात्यांचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करुन, सॅफ्रन थिंक टँक चे संस्थापक सिद्धांत मोहिते यांनी केंद्राकडे समान नागरी हक्क लवकरात लवकर लागू करण्याची मागणी केली आहे.

सिद्धांत मोहिते यांच्या मते, “युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये विविध धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे मंजूर करण्याऐवजी सर्व भारतीयांसाठी विवाह, घटस्फोट, उत्तराधिकार आणि दत्तक यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या समान कायद्यांचा समावेश आहे.”

आर्टिकल ४४ नुसार समान नागरी हक्कांच्या गरजेचा संदर्भ आणि पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी केला  आहे. सॅफ्रन थिंक टँक ने ठळकपणे नमूद केले आहे की भारतातील विविध जाती, जमाती, धर्म किंवा समाजातील तरुण जे त्यांचे विवाह समारंभ करतात त्यांनी विविध वैयक्तिक कायदे, विशेषत: घटस्फोट आणि विवाह संदर्भातील उद्भवलेल्या समस्यांशी संघर्ष करु नये.

गिरीराज सिंग तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांसारख्या केंद्रीय मंत्र्यांनीही समान नागरी हक्क लागू करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version