Uncensored मराठी

बलात्कार प्रकरणी लाच घेताना ACB च्या सापळ्यात पोलीस उपनिरीक्षक अटक; लाचेमध्ये वरिष्ठांचा हिस्सा असल्याचा दिला जबाब..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 8th March 2022

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पथकाने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथील पोलीस उप निरीक्षक भरत मुंडे याला रुपये ७ लाख लाच घेताना बेड्या ठोकल्या आहेत. सदर अधिकारी बलात्कार प्रकरणी लाच घेत असून त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सामील असल्याची माहिती सूत्रांमधून येत आहे. यात सामील असणारा हा वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण ? आणि अद्याप त्याची चौकशी का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई : एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भरत मुंडे याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) एका बलात्कार प्रकरणी एका इसमाला सहआरोपी न बनवण्यासाठी नातेवाईकाकडून सात लाख रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक भरत मुंडे याला रंगेहाथ पकडले. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव गुन्ह्यातून हटवण्यासाठी त्याने ही लाच मागितल्याची प्राथमिक माहिती आहे.

एनएम जोशी मार्ग पोलिसांनी नुकतेच एका व्यक्तीला बलात्कार प्रकरणात अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक भरत मुंडे (वय ३३) हे या बलात्कार प्रकरणी तपास अधिकारी होते, सूत्रानुसार आरोपीच्या नातेवाईकांना त्यांनी ३७ लाख रुपये न दिल्यास अटक करण्याची धमकी दिली. तत्पूर्वी एसीबीच्या वरळी येथील कार्यालयात त्यांनी लेखी तक्रार दिली. 

पोलिसांनी असा दावा केला आहे की, मुंडे ने ५ लाख रुपये स्वत:साठी, २ लाख रुपये त्याच्या वरिष्ठ निरीक्षकासाठी आणि ३० लाख रुपये बलात्कार पीडितेसाठी अशी मागणी केली. एसीबीने ४ मार्च रोजी मुंडे विरुद्धच्या तक्रारीची पडताळणी केली आणि ७ लाख रुपये स्वीकारताना त्यांना पकडले. परंतु त्याच वेळी मुंडे च्या जबाबानुसार ज्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यासाठी २ लाख रुपये घेतले गेले होते त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा चौकशी किंवा अटकेत का घेतले नाही? असा प्रश्न एनसीबी वर 

महाराष्ट्रात महिला सुरक्षेच्या दृष्टीने शक्ती कायद्यासारखे कायदे असून सुद्धा बलात्कारासारख्या आरोपांमध्ये मुंबईतील काही भ्रष्ट अधिकारी जर त्यातूनही लाच घेत असतील तर प्रशासनासाठी लज्जास्पद बाब असून शक्ती कायद्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. 

आरोपी तरुणाने दिलेल्या तक्रारीची एसीबी पथकाने खात्री करुन घेतली. त्यानंतर एसीबीने आपल्या पद्धतीने सापळा लावून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये भरत मुंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. परंतु या सर्व प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची माहिती अद्याप उघड नसून हे प्रकरण संशयास्पद ठरते आहे. आणि या प्रकरणात आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला आरोपी करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version