Culture

“बाबर आणि अकबर मध्ये अडकलेला इतिहास पुढे जायला हवा.” ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर महेश नेनेंची प्रतिक्रिया; मानले दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आभार..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 15th March 2022

विवेक अग्निहोत्री निर्मित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे देश भरातून कौतुक केले जात आहे. काश्मीरी पंडितांच्या अत्याचारांवर आणि त्यांच्या बलिदानावर आधारित असा ‘काश्मीर फाईल्स’ चाहत्यांच्या मनोमन रुजत चालला आहे.

अश्याच अनेक चित्रपटांचा संदर्भ देत चित्रपट निर्माते महेश नेने यांनी विवेक अग्निहोत्री यांचे गोड कौतुक करत त्यांचे आणि त्यांच्या टीम चे आभार मानले आहेत. ऐतिहासिक चित्रपट तसेच आपल्या मातृभूमीला लाभलेले थोर पुरुष यांच्या शूर गाथा जाणून घेणे आजच्या पिढीसाठी कसे गरजेचे आहे याचे महत्व त्यांनी पटवून दिले.

नुकत्याच अनावरण झालेल्या त्यांच्या ‘चिमाजी अप्पा – एक अविस्मरणीय योद्धा’ या चित्रपटाचा संदर्भ देत त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या आणि पेशव्यांच्या लढाई आणि बलिदानात मोलाचा वाटा असणाऱ्या काही योद्धा आणि सेनापतींबद्दलही सांगितले. त्यांचा इतिहास त्यांचे बलिदान याचे स्मरण पुढील पिढ्यांना होत रहावे आणि त्यादृष्टीकोनातून काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट पुढे नेणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी सांगितले.

“बाबर आणि अकबर मध्ये अडकलेला आपला इतिहास त्याही पुढे जायला हवा. आणि इतिहासातील काही नग्न सत्य समाजापुढे उभी रहायला हवीत आणि ते काम विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या टीम ने केले आहे. आजच्या पिढीसाठी हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


चिमाजी अप्पा – एक अविस्मरणीय योद्धा या त्यांच्या चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी पेशव्यांच्या पोर्तुगीजांविरोधी लढ्यात चिमाजी अप्पा यांचे महत्व रेखाटले असल्याचे सांगितले. शस्त्र आणि शास्त्रांत निपुण असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे पेशवे आणि निझाम हैदराबाद च्या लढ्यात मुख्य भूमिका निभावत होते. त्यांनी उत्तरेकडील मोहिमेत उज्जैन मधील मुघल सुभेदारांना हरवून उज्जैन पर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. 

कोकणातील वाढत चालेल्या पोर्तुगिजां विरोधात लढ्याची जबाबदारी चिमाजी अप्पांवर सोपवण्यात आली होती. 

दरम्यान कल्याण आणि ठाणे जिंकून उत्तरेकडे कूच करुन पेशव्यांची मदत करण्याकरता हि मोहीम सोडावी लागली. त्यांच्या गैरहजेरीत पोर्तुगीजांनी पुन्हा ठाण्यावर कब्जा केला. उत्तरेकडील मोहीम संपवून चिमाजी अप्पांनी पुन्हा एकदा कोकण मोहीम हाती घेतली ज्याचा शेवट वसईचा किल्ला मिळवून झाला. परंतु या मध्ये मराठा सैन्याचे फार नुकसान झाले. परंतु चिमाजी अप्पांनी हार मानली नाही आणि एके दिवशी सैन्याची सर्व ताकद एकवटून वसई किल्यावर खुल्या मैदानातून हल्ला करत काबीज केला आणि कोकण मोहिमेत आपले ऐतिहासिक योगदान दिले. 

चिमाजी आप्पा यांची शौर्यगाथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे महेश नेने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version