Culture

“बाजीराव मस्तानी मधील चिमाजी आप्पांची नकारात्मक व्यक्तिरेखा चुकीची” – चित्रपट निर्माते महेश नेने

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 6th March 2022

पेशव्यांच्या लढ्यात महत्वाची भूमिका निभावणारे चिमाजी आप्पा हे बाजीराव मस्तानी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दाखवल्याने, त्यांच्यावर सिनेमा करणारे  महेश नेने यांनी त्यांचे योग्य स्वरूप आणि त्यांच्या बलिदानाचा इतिहास प्रेक्षकांपुढे मांडणे कसे गरजेचे असल्याचे सांगितले. 

“बाजीराव मस्तानी हा सिनेमा दणक्यात सुरु झाला होता. त्यात संजय लीला भन्साली आणि त्यातील कलाकार व अप्रतिम संगीत म्हटल्यावर त्या सिनेमाला नक्कीच चारचांद लागले असतील अशी माझी खात्री होती. सिनेमातील मस्तानीची दणदणीत एन्ट्री, एका हिंदु राजाने दुसऱ्या हिंदु राजाला केलेली मदत आणि इतर अनेक दृष्य मनाला खरच भावून गेले.”

“चित्रपट पुढे सरकत होता आणि बाजीरावांचे धाकटे बंधु चिमाजी आप्पांची काही दृष्ये डोळ्यासमोर आली आणि तिथेच कुठेतरी सिनेमा वेगळ्या दिशेला भरकटतोय असे मनाला वाटू लागले.”

“चिमाजी आप्पांचे भारदस्त व्यक्तिमत्व त्यांचे पेशवाई मधील मोलाचे योगदान, प्रत्येक लढाईतील त्यांचे महत्व कुठेतरी बाजूला राहुन संपूर्ण नकारात्मक व्यक्तिरेखा समोर दिसू लागली. ज्यांनी १७३७ ते १७३९ या काळात पोर्तुगिजांना कडवी झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकून पोर्तुगीजांना हद्दपार केले अशा व्यक्तिचे असे संपूर्ण नकारात्मक चित्र पाहून मन विषण्ण झाले. आज चिमाजी आप्पांचे व्यक्तिमत्व जर अशा चुकिच्या स्वरूपात आपण तरुण पिढीपुढे मांडले तर त्यांनी, जे जिवाची पर्वा न करता देशासाठी निस्वार्थी योगदान दिले त्याला काहीच अर्थ राहणार नाही आणि त्याच दिवशी मी ठरविले कि चिमाजी आप्पांचा इतिहास आणि त्यांच्या शौर्याची गाथा लोकांसमोर आणायची आणि त्यांचे पेशवाईतील महत्व लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचे. हीच खरी त्यांना आणि त्यांनी गाजवलेल्या पराक्रमांना भावपूर्ण श्रध्दांजली ठरेल.”

याच करीता महेश नेने प्रोडक्शन “चिमाजी आप्पा- एक अविस्मरणीय योध्दा” हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला घेउन येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version