Mumbai Internal Security

मालाड मालवणी, मुंबई : मशिदीच्या बाहेरुन जाताना रामनवमी यात्रेत ढोल वाजत असल्यामुळे तब्बल २५ जणांवर गुन्हे दाखल..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 12th April 2022

श्री रामनवमी निमित्त आयोजित शोभा यात्रेत मालवणी येथील मशिदीसमोरुन जाताना ढोल ताशा वाजत असल्यामुळे आयोजक आणि इतर १० ते १५ जणांवर सरकारी फिर्यादीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोविड काळात सण साजरे करण्यास मज्जाव असल्याकारणाने या वर्षी च्या सणांची सुरुवात संपूर्ण भारतातच मोठ्या प्रमाणात झाली. मुंबईतही गेल्या महिन्याभरात अनेक हिंदू सण मोठ्या थाटात साजरे करण्यात आले. महाशिवरात्री, शिवजयंती, गुढीपाडवा, रामनवमी इत्यादी सणांना मुंबईत अनेक भागात वाद निर्माण झाले.

श्री रामनवमी च्या दिवशी मुंबईतील मालवणी भागात काही कार्यकर्त्यांनी शोभा यात्रेचे आयोजन केले होते. यामध्ये मिथिलेश सिंग, सुरेश शुक्ला, सुरेश गौड आणि बजरंग दल चे इतर कार्यकर्ते सामील होते. सदर यात्रा अंबोजवाडी, मालवणी परिसरातून निघाली होती. काही वेळाने ती अब्दुल हमीद रोडवरील जामा मशिदीबाहेरुन जात असताना एका अज्ञात इसमाने बाजूला मशीद असल्यामुळे ढोल ताशा वाजवण्यास बंद करण्याचे सांगितले. तितक्यात तेजिंदर सिंग तिवाना ने स्वतः ढोल वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे धार्मिक एकोपा टिकण्यास बाधक कृती घडल्याचे मालवणी पोलिसांनी एफ आय आर मध्ये सांगितले. 


अब्दुल हमीद रोड मार्गे पुढे ही मिरवणूक सवेरा हाईट, हजरत अली मशिदीजवळ आल्यानंतर नमाज सुरु असताना तेजिंदर सिंग आणि विनोद शेलार यांनी मिरवणूक थांबवून वाद्य वाजविणाऱ्यांना “बजाओ रे बजाओ” असे बोलून मोठ्याने गाणी लावण्यास सांगितले. त्यावेळी सुनील कोळी, विनोद शेलार, तेजिंदरसिंग तिवाना यांनी धार्मिक घोषणाबाजी केली त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. हे सर्व त्यांनी धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केले असल्याचे पोलिसांनी एफ आय आर मध्ये नमूद केले आहे. 

मिथलेश सिंग, सुरेश शुक्ला, सुरेश गौड, तेजिंदर सिंग तिवाना, विनोद शेलार, सुनील कोळी, सुजित मिश्रा, ब्रिजेश सिंग, दीपक रावराणे व इतर १० ते १५ जणांविरुद्ध मालवणी पोलिसांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने गुन्हे नोंद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version