Crime News

“सालो छोड़ेंगे नहीं तुमको, काट डालेंगे” ..इर्शाद तलवार फिरवत जोर जोरात ओरडत होता..!

Published

on

‘रमजान’ च्या नावाखाली गावगुंडांचा दहशतवाद, ‘श्री रामनवमी’ च्या जल्लोषात ‘जय श्री राम’ म्हणणाऱ्या हिंदू तरुणांवर केले तलवारीने वार..

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 12th April 2022

मानखुर्द मधील स्थित २९ वर्षांचा सोनू पारसनाथ चौधरी हा आपल्या आई व लहान भावासह राहत असून केबल टीव्ही दुरुसती चा व्यवसाय करतो. दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी श्री रामनवमीच्या सायंकाळी सोनू आपल्या काही मित्र नावे बाळा, नीरज, नेपाळी, गणेश व त्याचे मित्र दिलीप, कैलाश यांच्या सह श्री रामनवमी निमित्त साई भंडाऱ्याकरता सेल कॉलनी, चेंबूर येथे गेले असता तेथून परतताना जय श्री राम असे म्हणत होते.

दरम्यान रात्री १०.३० च्या सुमारास त्यांना म्हाडा कॉलनी मानखुर्द बिल्डिंग नंबर १०६ ते १०८ येथे अंदाजे २० ते ३५ वर्षीय १५  ते २० जणांच्या जमावाने अडवले व रमजान चालू असल्या कारणाने जय श्री राम म्हणण्यास रोखले. फिर्यादी सोनू व त्याच्या मित्रांनी त्यांची माफी मागून तेथून निघाले असता जमावाने शेवटच्या वाहनावरील सोनू ला खाली पाडून बांबूने आणि हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. तो जोराने ओरडत असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी त्याचे मित्रही तेथे आले असता जमावाने त्यांनाही बेदम मारहाण केली. 

मारणाऱ्यांपैकी एक इसम नाव इर्शाद, ५ वा मजला, बिल्डिंग नंबर १०८, म्हाडा कॉलनी मानखुर्द येथील स्थित हा सशस्त्र असल्याचे सोनूला आढळले. इतर लोक हाताने आणि बांबूने मारत होते तितक्यात इर्शाद नामक इसमाने सोनूच्या उजव्या हातावर तलवारीने वार केले. या मारहाणीत फिर्यादी सोनूच्या तोंडावर, पायावर व खांदयावर मार लागून तो गंभीर जखमी झाला. व त्याचे मित्र गणेश व नीरज यांनाही जबर मारहाण करून जखमी केले गेले. 

मारहाण सुरु असताना सदर जमावात आणखी काही जण सशस्त्र असून त्यांच्याकडेही तलवारी असल्याचे फिर्यादी सोनू ने सांगितले. तसेच इर्शाद नामक इसमाने तलवार फिरवत “सालो छोड़ेंगे नहीं तुमको काट डालेंगे” असे देखील जोर जोरात ओरडत असल्याचे सांगितले.

सदर हल्ल्यात आक्रमक जमावाला पाहून सोनू व त्याचे मित्र गणेश, नीरज हे प्राथमिक उपचार घेण्यास शताब्दी रुग्णालय येथे दाखल झाले व त्यानंतर मानखुर्द पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक महादेव पांडुरंग कोळी यांच्या कडे सदर घटनेबाबत तक्रार नोंदवली. आणि सदर प्रकरण अजित हणमंत घाडगे यांच्या कडे पुढील तपासासाठी सोपविण्यात आले.

देशात श्री रामनवमीच्या दिवशी हिंदूंवर असे अनेक हल्ले झाल्याचे प्रकार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version