Environment

BMC : सायन हॉस्पिटलच्या हॉस्टेल मध्ये १५८ झाडांची कत्तल ?

Published

on

लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय म्हणजेच मुंबईतील सायन हॉस्पिटल येथील वसतिगृहाच्या परिसरातील १५८ झाडे कापण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी..!

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 9th May 2022

सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ते आपले उपक्रम राबवत असतात. वृक्षांसंदर्भात ते अतिशय संवेदनशील असल्याचे नेहमीच समोर येते. त्यांच्या या समाज कार्यातून ते बऱ्याचदा पुरस्कृत ही केले गेले आहेत. या वेळी लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन म्हणजेच महानगरपालिकेचे सायन हॉस्पिटल याचे वसतिगृह व त्या परिसरात असणारी १५८ झाडे ही कापण्यात येणार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम ८ (३) (क) मधील तरतूदीनुसार झाडे काढण्यासाठी शशांक मेंहदळे आणि असोसिएट्स यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभागाकडे परवानगी साठी प्रस्ताव मांडला होता. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ/ उत्तर’ विभाग, सायन डिव्हीजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शहर सर्वेक्षण क्र. ६ (भाग) येथील एल.टी.एम.जी (सायन हॉस्पिटल) येथे यु.जी. हॉस्टेल व इतर महापालिका उपयुक्तता सेवा डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामात येणारी झाडे काढण्यास परवानगी दिली.

सयाजी शिंदे यांनी ५ मे रोजी सोशल मीडिया द्वारे माहिती देत महानगरपालिकेला ही वृक्षतोड थांबवण्याचे आव्हान केले असून यातील २ झाडे कापून झाले असल्याचे त्यांनी सांगितले. “दहशतवादी १५८ माणसांना मारणार असल्यासारखे या १५८ झाडांवर बॉम्ब टाकले जाणार असून यावरील पशु पक्षांचे संसार नष्ट होणार आहेत. तरी ही परवानगी का दिली? ती टाळता येऊ शकते का? ही झाडे वाचू शकतात का? याचा लवकरात लवकर विचार व्हावा; अन्यथा कोविड मध्ये आपण पाहिलंच सायन हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन ची अवस्था, कार्बनडायऑक्साईड घेणारे ऑक्सिजन देणारे पक्षांची निगा राखणारी झाडे का कापायची?” असे आव्हान त्यांनी ‘सह्याद्री देवराई’ या आपल्या वृक्षसंवर्धन मोहिमेमार्फत केली आहे. 

सोबतच ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रुग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत. अशी हळहळ सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version