Uncensored मराठी

“शो” च्या नावाखाली लोकांची फसवणूक करुन धर्मांतर करणाऱ्या बलात्कारी ‘पादरी बजिंदर सिंग’ च्या मुंबई “शो” ला विरोध..

Published

on

Akash Swarup Sonawane – Mumbai Uncensored, 10th May 2022

बलात्कार, अंधश्रद्धा आणि बाल अधिकार कायद्यांतर्गत असे अनेक गुन्हे दाखल असलेला पादरी बजिंदर सिंग धर्मांतरणाच्या कार्यक्रमासाठी मुंबईत येणार असल्याने अनेक शीख व हिंदू संघटनांचा विरोध सुरु झाला आहे. तसेच जिथे अंधश्रद्धा प्रसारित करून लोकांची फसवणूक करून त्यांचे उघडपणे धर्मांतरण केले जाते अशा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी मिळतेच कशी अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

पादरी बजींदर सिंग हा मूळचा पंजाब चा असून तो गेली अनेक वर्ष देशभरात असे कार्यक्रम करत आहे. अनेकदा त्याच्या कार्यक्रमांना विरोधही झाला आहे. कर्करोगी, अपंग आणि अशा अनेकांना बरे करण्याचा दावा करणाऱ्या बजींदर वर आपल्या एका अनुयायीचा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. शिवाय एका लहान मुलाचा भर सभेत मानसिक शोषण करत असल्याचा व्हिडीओ हि सोशल मीडिया वर व्हायरल झाला होता, त्यासंबधीही या पादरी वर गुन्हे दाखल आहेत.

मुंबईतून काही शीख व हिंदू संघटनांनी याविरुद्ध आवाज उठवला असून पोलिसांसमोर पादरी बजिंदर सिंग विरोधात काही मुद्दे मांडून हा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले आहे. सदर कार्यक्रम ही एक धर्मविरोधी कृती असून बजिंदर सिंग खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांच्या आधारे हिंदू आणि शीखांना ख्रिश्चन बनवत आहे. तसेच बाजिंदर सिंग आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जाहिरातीसाठी अपंग आणि कर्करोगी व्यक्तींना चमत्काराने बरे करण्याचा दावा करत आहे. ‘मेरा येशू येशू’ नामक मिम (विनोदी पोस्ट) इंटरनेटवर त्याच्या नावे व्हायरल झाली होती ज्यामध्ये तो एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने धर्मांतराच्या कृतीसाठी वापरताना दिसत होता. ज्यासंबंधी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव धर्मेंद्र भंडारी यांनी चंदीगडच्या उपायुक्त मनदिप सिंग ब्रार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. बजिंदर खून आणि बलात्काराच्या प्रकरणात जोडला गेला असून ‘चमत्कारिक उपचारांच्या बहाण्याने अनुयायांचे पैसे लुटल्याचा आरोपही त्याच्यावर दाखल केला गेला होता. असे या संघटनांनी तक्रारी मार्फत सांगितले आहे. 

सूत्रांच्या आधारे, तुरुंगवासाच्या काळात बजिंदर सिंग एका पादरीच्या संपर्कात आला आणि ख्रिश्चन धर्माकडे त्याचा कल वाढला. २०१८ मध्ये, पंजाबमधील झिरकपूर येथील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बजिंदर सिंगला अटक करण्यात आली होती . तो लंडनला जाण्यासाठी विमानात बसणार असताना दिल्ली विमानतळावरुन त्याला अटक करण्यात आली होती. २०१७ मध्ये परदेशात नेण्याचे आमिष दाखवून त्याने चंदीगड येथील एका महिलेवर तिच्याच घरात लैंगिक अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून  तिला धमकावत असे. एप्रिल २०२१ मध्ये मृत मुलीला पुन्हा जिवंत करण्याचा दावा करुन तिच्या कुटुंबाकडून ८०,००० रुपये उकळले होते. मृत मुलगी ही कर्करोगाने ग्रस्त असून लहान वयातच वडीलही वारले होते. आर्थिक संकटात सापडलेल्या तिच्या भावाला पादरीकडे काम करणारी एक स्त्री भेटली व पादरीला भेटण्यास चंदीगडला बोलावले. त्यानंतर पादरीने कुटुंबाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली आणि त्यांचे धर्मांतरही केले.

अशा काही पूर्वीच्या तक्रारी, पूर्वायुष्य आणि निषेधांच्या आधारे पादरी बजींदर सिंग च्या शारीरिक तसेच मानसिक समस्यांच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांना प्रभावित करण्यासाठी ‘मुंबई पीस फेस्टिवल’ आयोजित करत असून १२ मे २०२२ रोजी एमएमआरडीए ग्राउंड, बीकेसी मध्ये होणाऱ्या ‘मुंबई पीस फेस्टिव्हल’ विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आवाहन काही शीख व हिंदू संघटनांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version