Uncensored मराठी

उत्तरप्रदेशातून लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला अटक; पुणे एटीएसची कारवाई..

Published

on

Kalyani Gilbile – Mumbai Uncensored, 15th June 2022

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत काम करणाऱ्या तरूणाला पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून अटक केली आहे. तसेच त्याला आज पुणे न्यायालयात  हजर करणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. 

यापूर्वी, पुणे एटीएसने  बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या तरूणाला अटक केली होती. आता इनामुल हक या तरुणाला उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे कारवाई करत ताब्यात घेतले. इनामुल जुनैदप्रमाणेच दहशतवादी लष्करसाठी तरुणांना भरती होण्यासाठी चिथावणी द्यायचा, अशी माहिती तपासात मिळाली आहे. जुनैद हा मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील राहणारा दहावी नापास असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना लष्कर-ए-तोयबाच्या संघटनेत सामील करण्याचा प्रयत्न करु लागला होता. सोशल मीडियावरील अशा कारवायांमुळे जुनैदला याप्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. आता जुनैद आणि इनामुल हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच, इनामुलदेखील जुनैदप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना लष्कर-ए-तोयबा या दशहतवादी संघटनेकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version