Social

कोईम्बतूर ते शिर्डी : देशातील पहिल्या खाजगी रेल्वे सेवेला सुरुवात

Published

on

Kajal Gilbile – Mumbai Uncensored, 16th June 2022

भारत गौरव योजनेंतर्गत पहिल्या खाजगी रेल्वे सेवेला मंगळवारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ही खाजगी ट्रेन मंगळवारी कोईम्बतूरमधून ८०० प्रवाश्यांसह रवाना होऊन आज सकाळी ६.३० वाजता शिर्डी साईनगर स्थानकात पोहोचली. या पहिल्या वहिल्या खाजगी ट्रेनला चांगला प्रतिसाद लाभला असून, या ट्रेनमधून तब्बल ८१० प्रवाशांनी प्रवास केला आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला (Service Provider) २ वर्षांसाठी भाडे तत्वावर दिली आहे.

या स्पेशल ट्रेनमधून जवळपास १५००  प्रवासी प्रवास करू शकतात. या खाजगी रेल्वेमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० कोच आहेत. ही ट्रेन महिन्यातून किमान तीनदा कोईम्बतूर ते शिर्डी धावणार आहे. विशेष बाब म्हणजे, या ट्रेनचे तिकीट दर भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणार्‍या नियमित रेल्वे तिकीट दरांइतकाच असणार आहे.  तसेच, या ट्रेनच्या प्रवाशांना शिर्डीच्या साईबाबा मंदिरात विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ट्रेनची देखभाल हाउसकीपिंग ते संपूर्ण प्रवासातील ठराविक वेळेनंतर ट्रेनची साफसफाई सर्व्हिस प्रोव्हायडर्स करतील. तसेच ट्रेनमध्ये संपूर्ण शाकाहारी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

या ट्रेनचे तिकीट दर प्रवाशांकडून सामान्य तिकीट दरांइतकेच आकारले जाणार असून स्लीपर नॉन एसीसाठी २,५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५,००० रुपये, सेकंड एसीसाठी ७,००० रुपये आणि फर्स्ट एसीसाठी १०,००० रुपये मोजावे लागणार आहे. या रेल्वेमध्ये पोलीस दलासह एक रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर आणि खाजगी सुरक्षा कर्मचारीही असतील. देशातील ही पहिली खाजगी ट्रेन दक्षिणेतील राज्यांना शिर्डी कडे जोडणारी असून यामुळे कर्नाटक आणि तामिळनाडू मधून भाविक शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी थेट पोहोचतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version