Kalyani Gilbile, Mumbai Uncensored, 13th July 2022:
मंगळवारी, १२ जुलै रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकाने दुकाने आणि आस्थापना यांना मराठीत नामफलक (पाट्या) लावण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून देण्यात आली आहे, असे अहवालात नमूद केले. बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे ही दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे, यापूर्वीही ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
महानगरपालिकेने प्रथम १५ मे ही अंतिम मुदतवाढ दिली होती पण नंतर ती १ जुलै पर्यंत वाढविण्यात आली.
यापूर्वी व्यापारी आणि दुकानदारांच्या संघटनेने तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईमध्ये दुकाने आणि आस्थापनेवर मराठीत नामफलक लावण्यासाठी 30 जून पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती.
नागरी संस्थेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मराठी फलक धोरण आणि परिपत्रक यांचा अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता, राज्य सरकारने मार्च 2022 मध्ये दुकान आणि आस्थापना कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर सर्व दुकानांवरील आणि आस्थापनेवरील नामफलकात मराठीत नाव लिहिलेले असावे, असे बंधनकारक केले.
मराठी अक्षरे हि इतर भाषेपेक्षा मोठी असावी, असे आदेशात नमूद केले आहे.
जर या नियमांचे पालन केले नसल्यास, १ लाखांपर्यंत दंड आणि २००० रूपये प्रतिदंड कायद्याचे पालन न केल्यामुळे आकारले जाईल.
बीएससी कडे आतापर्यंत ५.०८ लाख दुकाने आणि आस्थापने नोंदणीकृत झाले आहेत