मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) अंधेरी पश्चिममधील म्हाडा वसाहतीतील मल्हारेश्वर शिव मंदिरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन संपूर्ण मंदिरात रेडी मिक्स काँक्रीट टाकून मंदिर बुजवण्याचा स्टेलर वर्ल्ड स्कूलच्या मुजोर व्यवस्थापनाचा डाव आखला गेला होता. हिंदुत्वाचे कार्य करणारे सिद्धांत मोहिते व त्यांचे सहकारी या धक्कादायक प्रसंगाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले व तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात सिद्धांत मोहिते यांच्या सोबत संजय पांडे, योगेश गुप्ता, शंकर मल्ला, रितेश सिंग, रामू कुशालकर, शिवकृष्ण गुरु, संदीप खैरे, विशाल रांजणकर, श्रेयश वळवडेकर, आकाश गोरे, गणेश केकाण, नारायण निली, आकाश मुतकेकर, अमित कांबळे व असंख्य हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते.
चार बांगला म्हाडा वसाहत अंधेरी पश्चिम परिसरात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल नगरमध्ये मल्हारेश्वर शिव मंदिर आहे. रात्रीच्या काळोखात या मंदिरात अचानकपणे पाच फूट रेडी मिक्स काँक्रीट टाकून मंदिर आणि परिसर बुजवण्याचा प्रयत्न स्टेलार वर्ल्ड स्कूलच्या मुजोर व्यवस्थापनाकडून व या शाळेचे मालक जीजस लाल यांच्याकडून केला गेला. त्याचबरोबर मंदिरात जाण्याचा मार्ग पत्रे लावून बंद केला. याची माहिती स्थानिकांना कळल्यानंतर त्यांनी ‘सॅफरॉन थिंक टॅंक’ या हिंदुत्ववादी संघटनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांबरोबर चर्चा करून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून मंदिरात जाण्याच्या मार्गावर लावलेले पत्रे काढून टाकण्याची जोरदार मागणी केली. कार्यकर्त्यांचा वाढता दबाव बघून वर्सोवा पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून मंदिरात जाण्याचा मार्ग खुला करून दिला.
घटनास्थळी हिंदूंच्या न्यायहक्कासाठी आंदोलन पेटवणाऱ्या सिद्धांत मोहिते यांनी जेव्हा FIR कॉपी तपासली तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि ‘१२० B’ हे कलम पोलिसांतर्फे लावण्यात आले नाही. ‘१२० B’ हे कलम सुद्धा लावण्यात यावे, यासाठी सिद्धांत मोहिते यांनी ऍडव्होकेट गणेश चव्हाण यांना त्वरित घटनास्थळी बोलवून मग पोलीस ठाण्यात घेऊन गेले व ACP रासम मॅडम यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही साठी विनंती केली.