नामांकित शिक्षण संस्थांचा अध्यक्ष असलेला जीजस लाल हा एकाच वेळी अनेक शिक्षण संस्था चालवत आहे. स्टेलर इंटरनॅशनल स्कुल, युनिव्हर्सल हायस्कूल, प्राइमस पब्लिक स्कूल, लॉर्ड्स युनिव्हर्सल कॉलेज, सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूल, सिल्व्हर ओक युनिव्हर्सल स्कूल, अल्फा विस्डम विद्याश्रम, युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, विद्या विकास युनिव्हर्सल कॉलेज, विद्या विकास एज्युकेशन ट्रस्ट, युनिव्हर्सल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इत्यादी.
कार्रवायांची पार्श्वभूमी
मार्च २०२२ मध्ये आयकर विभागाच्या कार्रवायांदरम्यान जीजस लाल च्या मुंबईत बारा ठिकाणी तसेच वसईत २, नाशिक मध्ये ३ ठिकाणी, शिवाय ठाणे, औरंगाबाद आणि मीरा भाईंदरमध्येही छापे टाकण्यात आले. त्याचबरोबर बंगळुरू आणि तामिळनाडूच्या त्रिची येथील जागांवरही छापे टाकण्यात आले.
हिंदू मंदिर उघडपणे उध्वस्त करूनही अद्याप अटक नाही. स्थानिक प्रशासनाचा कानाडोळा ?
जीजस लाल याने काही दिवसांपूर्वीच म्हाडा वसाहत, ४ बंगला, अंधेरी पश्चिम येथील मल्हारेश्वर शिव मंदिरात रात्री अंधाराचा फायदा घेऊन संपूर्ण मंदिरात रेडी मिक्स काँक्रीट टाकून मंदिर बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. येथील हिंदू देवी देवतांच्या मुर्त्या, शिवलिंग आणि हिंदूंच्या भावना जोडले गेलेले इतर धार्मिक साहित्य उध्वस्थ करण्यात आले. हे सर्व रात्रीच्या अंधारात केल्यामुळे जाणीवपूर्वक होत असल्याचे सदर घटनेतून स्पष्ट होत आहे. स्टेलर इंटरनॅशनल स्कूलच्या मुजोर व्यवस्थापनाचा हा डाव असल्याचे स्थानिक रहिवासीयांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. सॅफ्रन थिंक टॅंक चे अध्यक्ष सिद्धांत मोहिते व काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबावानंतर या प्रकरणी जीजस लाल व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्टेलर इंटरनॅशनल स्कूल चा प्रमुख जीजस लाल व कल्पेश पळसमकर, प्रवेश पाटील आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मंदिरात काँक्रीट टाकून मंदिरातील शिवलिंग, नंदीची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती, तीन मुखी दत्तात्रय मूर्ती, श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि इतर सर्व मुर्त्या आणि साहित्य चोरल्या अथवा उद्धवस्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला गेला असून अद्याप १५ हुन अधिक दिवस उलटल्या नंतरही कोणालाही अटक झालेली नाही.
सॅफ्रन थिंक टॅंक तसेच अनेक हिंदू संघटनांनी पोलिसांकडे १५ दिवसांपूर्वी भादंवि कलम १२० ब हे सुद्धा तक्रारीमध्ये टाकण्यात यावा, यासाठी विनंती केली होती. हि विनंती मान्यकरून सुद्धा अद्याप स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणी कोणतीही कार्रवाई झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
जीजस लालच्या ‘स्टेलर इंटरनॅशनल स्कुल’ कडे जाणाऱ्या रस्त्याचे रहस्य –
सदर घटनेची माहिती आम्हाला अनेक बेनामी पत्रांद्वारे प्राप्त झाली होती. अनेक वर्षांपासून सदर भूखंडावर गोरगरिबांच्या शेकडो झोपडपट्ट्या होत्या. मागील काही महिन्यांपासून सूत्रांच्या माहितीनुसार जीजस लालच्या माणसांच्या फेऱ्या होत असे. सदर घटने दरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांवर अनेक प्रकारे अत्याचार करून त्यांना बेघर करण्यात आले आहे. काहींना तर पाच दहा हजारांचे अमिश दाखवून जागा खाली करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पण विषय याहूनही गंभीर आहे. ज्या भूखंडात या झोपडपट्या होत्या तो भूखंड म्हाडाच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्या उध्वस्थ करून शाळेकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला परंतु म्हाडाच्या कोणत्या परवानगीच्या आधारे येथील झोपड्या तोडून नवीन रस्ता बनवण्यात आला ? व स्टेलर इंटरनॅशनल स्कुल कडे जाणारा रस्ता म्हाडाच्या कोणत्या टेंडर अंतर्गत बांधण्यात आला ? हे रहस्य अद्याप उलगडले नाही.
अंधेरीत बेकायदेशीररीत्या शाळा चालवत असल्याचा पालकांचा आरोप
अंधेरीतील स्टेलर इंटरनॅशनल स्कुलचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच शाळा सुरु करून जुनिअर व सिनिअर केजी वर्गातील लहान मुलांचा जीव धोक्यात घालण्याचे काम जीजस लाल यांच्याकडून होत असल्याचे समोर आले आहे.
अनेक पालकांच्या म्हणण्याप्रमाणे, शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु असतानाही मुलांचे वर्ग सुरु आहेत, जर काही अपघत घडला तर यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
गोरेगाव मधील सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूल ची इमारत धोकादायक, हजारो विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात!
गोरेगाव मधील सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूल हे सुद्धा जीजस लाल याच्याच मालकीचे आहे. सदर शाळेत १८०० विध्यार्थी, १०८ शिक्षक व शेकडो कर्मचारी कार्यरत आहे, शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे या सर्वांचा जीव धोक्यात आहे. मध्यंतरी हि शाळा धोकादायक असल्यामुळे १० दिवस बंद ठेवण्यात आली होती. परंतु नाममात्र दुरुस्ती करून पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यात आली, हि धक्कादायक बाब आहे. आम्हाला प्राप्त झालेल्या बेनामी पत्रांद्वारेच ही माहिती आम्हाला प्राप्त झाली.
बेकायदेशीर होर्डिंग व म्हाडाच्या जागेत अतिक्रमण
सरदार वल्लभाई पटेल नगर, अंधेरी पश्चिम येथे बेकायदेशीर रित्या स्टेलर ग्रुप च्या नावाने भले मोठे लोखंडी होर्डिंग लावण्यात आले आहे. स्टेलर इंटरनॅशनल शाळेच्या भूखंडाच्या बाहेर सुद्धा जीजस लाल व त्याच्या लोकांनी पात्रे लावून मोकळ्याजागेत अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुद्धा काही स्थानिक रहिवाश्यांनी आम्हाला सांगितले.