Uncensored मराठी

अभिनेता आदित्य सातपुतेने लॉंच केला चहाचा ब्रॅंड

Published

on

उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाच्या जोरावर सोशल मीडियावर आदित्यने स्वत:ची ओळख निर्माण केली. अल्पावधीतच आदित्यने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून जवळपास २५ हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. पण आता आदित्य सातपुते व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने ‘कॅफे टी डे’ नावाचा चहाचा ब्रॅंड नुकताच लॉंच केला आहे. तसेच ‘अ सीप फिल्ड वीथ डिलाइट’ अशी या ब्रॅंडची टॅग लाइन आहे. या ब्रॅंडचे उद्घाटन पुण्यात संपन्न झाले असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात या ब्रॅंडच्या दहा फ्रॅंचाइसी एकत्र सुरू होणार आहेत.

आत्तापर्यंत अभिनेता आदित्य सातपुतेने हुरपरी, ट्रिंग ट्रिंग, फक्त बायको पाहिजे, लयं गुणाची हाय, रूप साजरं असे जवळपास २५ हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. त्यातले सर्वच म्युझिक अल्बम सुपरहिट झाले आहेत. त्याचा स्वतःचा A/7 स्टुडिओ नावाचा कपड्यांचा ब्रॅंड देखिल आहे. आदित्यचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

नव्या कॅफे टी डे या चहाच्या ब्रॅंडविषयी आदित्य सांगतो, “खरंतर मला विश्वासच बसत नाही आहे. परंतु मला लहानपणापासूनच काहीतरी नविन सुूरू करायच होत. आणि ते स्वप्न आज सत्यात उतरतं आहे. नविन उद्योजकांना एक संधी मिळावी हे या ब्रॅंडचं उद्दीष्ट आहे. नविन तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. माझी पत्नी नेहा सातपुते ही या ब्रॅंडची मॅनेजींग डायरेक्टर असेल. आपल्या महाराष्ट्रातील महिलांना एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टीने हा ब्रॅंड प्रयत्न करेल. एस ॲन्ड एसचे संस्थापक मनोज सांगळे आणि दिग्दर्शक रोहित जाधव यांनी या ब्रॅंडसाठी मला साथ दिली. मी माझ्या कुटुंबाचे आणि चाहत्यांचे आभार मानतो. आणि तरूणांना आव्हान करतो की त्यांनी सुद्धा व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचं धाडसं करावं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version